Wakad : ‘राॅंग साईड’ने येणाऱ्या दुचाकीच्या धडकेत जेष्ठ नागरिक ठार 

एमपीसी न्यूज – ‘राॅंग साईड’ने भरधाव वेगाने येणाऱ्या दुचाकीच्या धडकेत जेष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला आहे. ही घटना 25 जुलै रोजी वाकड पोलीस ठाण्याच्या समोरील नर्सरी रोडवर सायंकाळी साडेसहाच्या सुमारास घडली.

विकास तिकडे ( वय. 65, रा. थोरात कॉलनी, कर्वेनगर, पुणे ) असे मृत्यू झालेल्या जेष्ठ नागरिकाचे नाव आहे.

याप्रकरणी संध्या शामराव कमलाकर ( वय. 59, थोरात कॉलनी, कर्वेनगर, पुणे ) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दुचाकीस्वार तुकाराम बालाजी इबिते ( वय. 19, भुजबळ चौक, वाकड) याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत विकास तिकडे कामावरून सुटल्यानंतर वाकड पोलीस चौकी समोरील नर्सरी रस्त्याकडेने पायी चालत होते. यावेळी ‘राॅंग साईड’ने भरधाव आलेल्या ( एमएच 14 एमआर 1024) या दुचाकीने त्यांना मागून जोरात धडक दिली. या धडकेत गंभीर विकास तिकडे गंभीर जखमी झाले व त्यांचा मृत्यू झाला. पोलीस अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.