Wakad : जबरदस्तीने घरात घुसून अल्पवयीन मुलीवर लैंगीक अत्याचार

एमपीसी न्यूज – पालक घरी नसताना जबरदस्तीने घरात घुसून अल्पवयीन मुलीवर लैंगीक अत्याचार केल्याचा प्रकार वाकड परिसरात उघडकीस आला आहे. हा प्रकार 2019 च्या दसरा सणा-दिवशीपासून 15 फेब्रुवारी 2020 या दरम्यान घडला आहे.

याप्रकरणी पीडित मुलीच्या 38 वर्षीय आईने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अमोल वाघमारे (वय 27, रा. थेरगाव) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घरात पालक नसल्याचा गैरफायदा घेऊन आरोपीने जबरदस्तीने घरात घुसून ‘मी तुझ्यावर प्रेम करतो’ असे म्हणत अल्पवयीन मुलीवर लैंगीक अत्याचार केला. ‘मम्मी पप्पा घरी नाहीत, तुम्ही बाहेर जा’ असे 14 वर्षीय पीडित मुलीने विनवणी केली असता तिचे तोंड दाबून अत्याचार केला. हा प्रकार 2019 च्या दसरा सणा-दिवशीपासून 15 फेब्रुवारी 2020 या दरम्यान वारंवार घडला आहे.

याबाबत घरी सांगितल्यास पीडित मुलीसह, आई, वडील व भावाला जीवे मरण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.