Wakad: शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांच्या वतीने गरजूंना अन्न-धान्याचे किट वाटप

एमपीसी न्यूज – पिंपरी-चिंचवड महापालिकेतील शिवसेना गटनेते राहुल कलाटे हे लॉकडाउनमध्ये गरजूंच्या मदतीला धावले आहेत. कलाटे यांनी आजपर्यंत गरजू व गोरगरीब कुटुंबांना सुमारे सात हजार अन्न-धान्याच्या किटचे वाटप केले आहे.

कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी भारतात 25 मार्चपासून लॉकडाउन आहे. त्याचा तिसरा टप्पा सुरु आहे. लॉकडाउन असल्यामुळे अनेकांच्या हाताला काम नाही. यामुळे हातावर पोट असणा-या नागरिकांचे मोठे हाल होत आहे.

शिवसेना गटनेते राहुल कलाटे यांचा वाकड प्रभाग आहे. वाकडमध्ये काही भागात उच्चभ्रु तर काही भागात अतिशय गोरगरीब नागरिक वास्तव्याला आहेत. हाताला मिळेल ते काम करुन आपली उपजीविका भागविणारे हे नागरिक आहेत.

लॉकडाउनमुळे या नागरिकांच्या हाताला काम नाही. त्यामुळे त्यांच्या रोजीरोटीचा प्रश्न निर्माण झाला होता. परंतु, शिवसेना गटनेते राहुल कलाटे त्यांच्या मदतीला धावून आले आहेत. कलाटे यांच्यावतीने वाकड भागातील गरजु व गोरगरीबांना अन्नधान्याच्या किटचे वाटप केले जात आहे. गहू, तांदूळ, तेल, मीठ, हळद, मसाल्याचा समावेश असलेल्या अशा सुमारे सात हजारहून अधिक किटचे आजपर्यंत वाटप करण्यात आले आहे.

याबाबत राहुल कलाटे म्हणाले, ”लॉकडाउनमुळे अनेक गोरगरीब नागरिकांच्या हाताला काम नाही. त्यामुळे त्यांचे हाल होत आहेत. एकवेळ जेवण्याची त्यांची व्यवस्था होत नाही. त्यासाठी मागील काही दिवसांपासून वाकड भागातील गरजू आणि गरीब नागरिकांना अन्नधान्याच्या किटचे वाटप करण्यात येत आहे”.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.