Wakad : राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेसाठी श्रावणी फुगेची निवड

एमपीसी न्युज – चेन्नई येथे झालेल्या 28 व्या जी .व्ही . माळवणकर राज्यस्तरीय नेमबाजी स्पर्धेसाठी शहरातील थेरगावच्या श्रावणी भालचंद्र फुगे हिने 10 मीटर एअर पिस्टल स्पर्धेमध्ये चारशे गुणांपैकी 360 गुण संपादन करीत नोव्हेंबर मध्ये होणाऱ्या राष्ट्रीय पातळीवरील नेमबाजी स्पर्धेत स्थान मिळवले आहे.

_MPC_DIR_MPU_II

या स्पर्धेत देशभरातुन सुमारे पाच हजारांहून अधिक स्पर्धक सहभागी झाले होते, देशात 12 व्या क्रमांकाची शुटर तर महाराष्ट्राच्या ज्युनिअर शुटरमध्ये दुसऱ्या क्रमांकाची ज्युनिअर शुटर म्हणून श्रावणी फुगे हिने मानांकन प्राप्त केले, ती निगडीतील ज्ञानप्रबोधिनी (गुरुकुल) शाळेत दहावीच्या वर्गात शिकत आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.