Wakad : सिगारेटचे पैसे मागितल्यावरून टपरीचालक भावंडांना मारहाण; तिघांना अटक

एमपीसी न्यूज – सिगारेटचे पैसे मागितल्याच्या कारणावरून टपरी चालविणा-या दोन भावंडांना दगडाने मारहाण केली. ही घटना शनिवारी (दि. 9) सकाळी काळेवाडी येथे घडली. याप्रकरणी पोलिसांनी तिघांना अटक केली आहे.

रोहित ऊर्फ डोंग्या प्रभाकर वाघमारे (वय 19, रा. नढेनगर, काळेवाडी), अजिंक्‍य ऊर्फ पवन श्‍याम देशमुख (वय 21, रा. भारतमाता चौक, काळेवाडी), विकी राजू पठारे (वय 19, रा. ज्योतिबानगर, काळेवाडी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

निजाम असरफअली खान (वय 20, रा. इंडियन कॉलनी, नढेनगर, काळेवाडी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी खान यांची तापकीरमळा, काळेवाडी येथील एका हॉटेलसमोर पानाची टपरी आहे. त्या टपरीवर आरोपींनी सिगारेट घेतली आणि पैसे दिले नाहीत. यामुळे खान यांनी पैशाची मागणी केली.

यावरून चिडलेल्या आरोपींनी शिवीगाळ करीत निजाम खान आणि त्याचा भाऊ रईस खान या दोघांना दगडाने मारहाण केली. यामध्ये दोन्ही भाऊ जखमी झाले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.