Wakad: भरधाव टेम्पोच्या धडकेत दोघे जखमी

Wakad: speedy tempo dashed two-wheeler, two injured ते वाकड येथील सूर्या हॉस्पिटलजवळ आले असता आरोपी अरिफ चालवत असलेल्या टेम्पोने त्यांना पाठीमागून जोरदार धडक दिली.

एमपीसी न्यूज- भरधाव जाणाऱ्या टेम्पोने धडक दिल्यामुळे दुचाकीवरील दोघेजण जखमी झाले. ही घटना शनिवारी (दि.14) रात्री मुंबई बंगलोर महामार्गावर वाकड येथे घडली.

विशाल सिताराम कस्पटे (वय 34, रा. कस्पटे वस्ती, वाकड) असे जखमी दुचाकीस्वाराचे नाव असून त्यांनी सोमवारी (दि.15) हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अरिफ मोहम्मद पिरजादे (वय 38, रा. आंबेवाड, जि. गुलबर्गा, कर्नाटक) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री फिर्यादी विशाल कस्पटे व त्यांचा मित्र विशाल मानकर हे दोघेजण दुचाकीवरून मुंबई-बेंगलोर महामार्गावरून चालले होते.

ते वाकड येथील सूर्या हॉस्पिटलजवळ आले असता आरोपी अरिफ चालवत असलेल्या टेम्पोने त्यांना पाठीमागून जोरदार धडक दिली.

या अपघातात दुचाकीवरील मानकर व कस्पटे हे दोघेही गंभीर जखमी झाले. तसेच त्यांच्या दुचाकीचेही नुकसान झाले. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.