Wakad : जाब विचारला म्हणून चाकुने केले वार

एमपीसी न्यूज – नातेवाईकाला मारहाण (Wakad) केल्याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीला चाकूने वार करत जखमी केले. ही घटना शुक्रवारी (दि. 25) रात्री शेडगे वस्ती, वाकड येथे घडली.

राजकपूर बच्चूलाल कनोजिया (वय 42, रा. काळेवाडी) असे जखमी व्यक्तीचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार प्रशांत महादेव शेडगे (वय 21), प्रदीप मीनानाथ कदम (वय 21, दोघे रा. शेडगे वस्ती, वाकड) या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Wadmukhwadi : जागेवर अतिक्रमण करणाऱ्या तिघांविरोधात गुन्हा

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी किरकोळ कारणावरून फिर्यादी (Wakad) राजकपूर यांचा मेहुणा पप्पू कनोजिया याला मारहाण केली. त्याचा जाब विचारण्यासाठी फिर्यादी आरोपींच्या घरी गेले. त्यावेळी आरोपी प्रशांत याने राज कपूर यांच्यावर चाकूने वार केला. प्रदीप याने राजकपूर यांच्या डोक्यात गॅस सिलेंडर मारून त्यांना गंभीर जखमी केले. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.