Wakad : ताथवडे येथे पादचारी तरुणाला बेदम मारहाण

एमपीसी न्यूज – रस्त्याने पायी जात असलेल्या तरुणाला दोघांनी अडवून बेदम मारहाण केली. ही घटना शनिवारी (दि. 8) दुपारी पाचच्या सुमारास ताथवडे येथे घडली.

अमोल भाऊराव लांडगे (वय 27, रा. अशोक नगर, ताथवडे) असे जखमी तरुणाचे नाव आहे. याप्रकरणी गणेश शेळके, अक्षय नवले (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अमोल शनिवारी दुपारी पाचच्या सुमारास ताथवडे येथे के. एम. हॉटेल जवळून रस्त्याने पायी जात होते. त्यावेळी आलेल्या दोघांनी त्यांना अडवले.

अमोलच्या हातावर, पाठीवर, कमरेवर मारून गंभीर जखमी केले. याबाबत गुन्हा दाखल केला असून वाकड पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.