BNR-HDR-TOP-Mobile

Wakad : गळफास घेऊन युवतीची आत्महत्या; आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट

एमपीसी न्यूज – राहत्या घरात ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन एका युवतीने आत्महत्या केली. ही घटना सोमवारी (दि. 12) सकाळी साडेदहाच्या सुमारास गुजरवस्ती, थेरगाव येथे उघडकीस आली.

यशोधा अनिल देवकर (वय 18, रा. गुजरवस्ती, थेरगाव) असे आत्महत्या केलेल्या युवतीचे नाव आहे.

वाकड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यशोधा हिने घरात कोणीही नसताना ओढणीच्या सहायाने लाकडी खांबाला गळफास घेतला. आत्महत्येचे नेमके कारण अद्यापपर्यंत समजू शकले नाही. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

Advertisement

HB_POST_END_FTR-A3