_MPC_DIR_MPU_III

Wakad : काळेवाडी येथे पोलिसांना मारहाण करणाऱ्यांवर कठोर कारवाई करा – प्रदीप नाईक

एमपीसी न्यूज – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशात लाॅकडाऊन लागू करण्यात आला आहे. तसेच संचारबंदी असताना विनाकारण बाहेर फिरणाऱ्या नागरिकांवर कारवाईचे आदेश असताना काही नागरिक पोलिसांशी हुज्जत घालत आहेत. असाच प्रकार काळेवाडी परिसरात घडला असून तेथे पोलिसांना मारहाणीची घटना घडली आहे या घटनेत दोषी असणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी मागणी माहिती अधिकार कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी केली आहे.

महाराष्ट्र पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल आणि पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त संदीप बिष्णोई यांच्याकडे पत्राद्वारे ही मागणी करण्यात आले आहे. दरम्यान प्रदीप नाईक यांनी पत्रात म्हटले आहे की दिवस-रात्र नागरिकांचा कोरोनासारख्या जीवघेण्या आजारापासून बचाव करण्यासाठी पोलीस व आरोग्य अधिकारी मेहनत घेत असताना अशी घटना घडणे निंदनीय आहे तसेच तात्काळ या घटनेची दखल घेऊन नियम मोडणाऱ्या नागरिकांवर कठोर कारवाई करण्याची मागणी प्रदीप नाईक यांनी पत्रात केली आहे.

दरम्यान 27 एप्रिल रोजी काळेवाडी परिसरात विनाकारण बाहेर करणाऱ्या नागरिकांना ‘बाहेर का फिरत आहे’ असे, विचारले असता नागरिकांनी पोलिसांशी हुज्जत घालायला सुरुवात केली व पोलिसांच्या हातातील काठी हिसकावून त्यानांच काठीने मारण्याचा प्रकार घडला होता. या प्रकरणाची दखल घेऊन संबंधित दोषी नागरिकांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपी असलेल्या लोहमार्ग पोलिसाला सेवेतून निलंबित करण्यात आले आहे.

_MPC_DIR_MPU_I

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.