Wakad : मुलीच्या अज्ञानाचा फायदा घेत ठेवले शारीरिक संबंध; गरोदर राहिल्यावर प्रकार उघडकीस

एमपीसी न्यूज : वाकडमध्ये एका 16 वर्षीय मुलीच्या अज्ञानाचा (Wakad ) फायदा घेऊन तिच्या सोबत प्रेमसंबंध ठेवले. त्यानंतर तिच्यासोबत जबरदस्ती शारीरिक संबंध ठेऊन तिला गरोदर करण्याचा धक्कादायक प्रकार वाकड येथे घडला आहे. हा प्रकार  सप्टेंबर 2022 ते 15 फेब्रुवारी 2023 या कालावधीत घडला. 

मेवालाल चौहान (वय 30वर्ष, रा.खंडाळा) असे आरोपीचे नाव आहे. तर आरोपी हा फिर्यादीच्या भावाचा जावई आहे. घरी कोणी नसल्याचा फायदा घेतल्याचा आरोप करण्यात आला आहे.

Alandi News : माऊलींच्या समाधीवर चंदन उटीद्वारे साकारले महागणपतीचे रूप

या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आलेली नसून वाकड पोलिस घटनेचा तपास करत (Wakad) आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.