Pimpri Crime News : वाकड, तळेगाव व भोसरीत हातभट्टी, देशी -विदेशी दारूसाठा जप्त

एमपीसी न्यूज – वाकड, भोसरी आणि तळेगाव दाभाडे परिसरात दारुबंदी कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे. या ठिकाणाहून हातभट्टी, देशी, विदेशी दारूसाठा जप्त करण्यात आला आहे. शुक्रवारी (दि.30) या तिन्ही ठिकाणी कारवाई करण्यात आली.

थेरगाव येथील ज्ञानेश्वर कॉलनी येथे वाकड पोलिसांनी कारवाई केली. या ठिकाणावरुन पन्नास लिटर हातभट्टी दारु जप्त करण्यात आली. याप्रकरणी जुली अल्बर्ट जोसेफ (वय 40, रा. थेरगाव) हिच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

भोसरी एमआयडीसी येथील कारवाईत 130 लिटर हातभट्टी दारु जप्त करण्यात आली असून, संतोष बबन कांबळे (वय 32, रा. इंद्रायणी नगर, भोसरी) याच्या विरोधात दारुबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तिसरी कारवाई सोमाटणे-परंदवाडी रोडलगत असलेल्या अर्थव चायनीजच्या मागील बाजूस मोकळ्या जागेत करण्यात आली. याठिकाणीहून देशी, विदेशी दारू जप्त करण्यात आली. याप्रकरणी ओम राजू  भोते (वय 19, रा. मावळ, पुणे) व मयुर अर्जुन भोते या दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.