Wakad TDR : कथित टीडीआर घोटाळ्याविरोधातील संभाजी ब्रिगेडच्या साखळी उपोषणाला अडीच महिने पूर्ण

एमपीसी न्यूज – उन्हाची वाढती तीव्रता.. उदासीन प्रशासन.. निवडणुकांच्या कामाचे (Wakad TDR)निमित्त करत कथित टीडीआर घोटाळ्याप्रकरणी कारवाई बाबत महापालिका प्रशासन ढिम्मच दिसत आहे. संभाजी ब्रिगेडच्या वतीने दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यासाठी सुरू असलेल्या उपोषणाला अडीच महिने पूर्ण झाली आहेत.मात्र महापालिका आयुक्त निद्रावस्थेत असल्याची भूमिका घेत आहेत.
त्यांची ही भूमिका संशयास्पद असून तेच दोषी अधिकाऱ्यांना पाठीशी घालत असल्याचे स्पष्ट होत असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडचे पिंपरी-चिंचवड शहराध्यक्ष सतीश काळे यांनी प्रसिद्धीपत्रकारद्वारे केला.

काळे यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकात नमूद केले आहे की, वाकड येथील(Wakad TDR) कथित टीडीआर घोटाळा प्रकरणी महापालिकेच्या नगररचना विभागाचे उपसंचालक प्रसाद गायकवाड, शहर अभियंता मकरंद निकम तसेच इतर दोषी अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी संभाजी ब्रिगेडने साखळी उपोषण सुरू केले आहे.महापालिकेच्या प्रवेशद्वारासमोरच सुरू असलेल्या या साखळी उपोषणाला आत्तापर्यंत अडीच महिने पूर्ण झाले आहे. संभाजी ब्रिगेडचे हे साखळी उपोषण महापालिकेच्या इतिहासातील सर्वात जास्त काळ चालू असलेले साखळी उपोषण आहे. ब्रिगेडच्या या साखळी उपोषणात जिल्हा अध्यक्ष गणेश दहिभाते शहराध्यक्ष सतिश काळे जिल्हा कार्याध्यक्ष रविंद्र चव्हाण शहर कार्याध्यक्ष वैभव जाधव सचिव रावसाहेब गंगाधरे संघटक वसंत पाटील उपाध्यक्ष अभिषेक गायकवाड,योगेश पाटील,संतोष शिंदे याचा सहभाग आहे,सदर साखळी उपोषणाला आत्तापर्यंत अनेक सामाजिक संघटना राजकीय लोकप्रतिनिधींनी भेट देऊन आपले समर्थन दर्शविले आहे.

Maval LokSabha Elections 2024 : दिलीप वेंगसरकर अकॅडमी, बिर्ला हॉस्पिटलमध्ये  मतदार जनजागृती अभियान

टीडीआर चा गैरव्यवहार झाल्याचे सगळेच मान्य करतात. मात्र कारवाई करण्याबाबत प्रशासन टाळाटाळ करत आहे. परिणामी पिंपरी चिंचवड महापालिकेची बदनामी राज्यभर होत आहे.

महापालिका आयुक्त प्रशासनाचे प्रमुख म्हणून काम करत असताना त्यांचा त्यांच्या अधिकाऱ्यांवर वचक राहिला नसल्याचे दिसत आहे. नव्हे तर ते अधिकाऱ्यांना चुकीचे काम केल्यास शिक्षा करणे ऐवजी पाठीशीच घालत असल्याचे दिसत आहे. संभाजी ब्रिगेडच्या आंदोलनाकडे कानाडोळा केल्याने हे अधिकच स्पष्ट होत आहे.

आयुक्तांना टीडीआर घोटाळ्या प्रकरणी असणारी वास्तवता माहित असताना देखील ते जाणीवपूर्वक कारवाईकडे दुर्लक्ष करत आहेत. जागे असूनही झोपेची सोंग घेणाऱ्या आयुक्तांचे डोळे केंव्हा उघडणार असा सवाल संभाजी ब्रिगेड उपस्थित करत आहे. लवकर याबाबत कारवाई न झाल्यास आगामी काळात संभाजी ब्रिगेड वेगळ्या पद्धतीने आंदोलन छेडेल,असा इशारा सतीश काळे यांनी दिला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.