Wakad : टेम्पो ट्रॅव्हलर-दुचाकीच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू

एमपीसी न्यूज – काळेवाडी फाटा येथे मंगळवारी (दि. 14) सकाळी साडेसातच्या सुमारास ट्रॅव्हलर आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला. यामध्ये गंभीर जखमी झालेल्या दुचाकीस्वाराचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

बबन आनंदराव काटे (वय 50, रा. नढेनगर, काळेवाडी), असे मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. याप्रकरणी दत्ता बबन काटे (वय 19) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार मुकेश मच्छीन्द्र गाडे (वय 31, रा. काळाखडक, वाकड) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत बबन हे त्यांच्या दुचाकीवरून (एमएच 14 / जीझेड 8472) काळेवाडी येथून कामाला जात होते. काळेवाडी फाटा येथे त्यांच्या दुचाकीची आणि टेम्पो ट्रॅव्हलरची (एमएच 14 / सीडब्ल्यू 4097) समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघात बबन हे गंभीर जखमी झाले.

रस्त्यावर मोठ्या प्रमाणात त्यांचा रक्तस्त्राव झाला. स्थानिक नागरिकांनी त्यांना तात्काळ उपचारासाठी जवळच्या एका खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
You might also like