Wakad: हलगर्जीपणे कार चालविल्याने भीषण अपघात; एका दुचाकीस्वाराचा मृत्यू

Wakad: Terrible accident due to careless driving; Death of a biker उड्डाणपुलाजवळ आरोपीने कारचा इंडिकेटर न लावता अचानक कार रस्त्याच्या बाजूला घेतली. यामुळे वेणुगोपाल त्यांच्या दुचाकीसह कारवर जाऊन आदळले.

एमपीसी न्यूज – वाहतुकीच्या नियमांचे पालन न करता हलगर्जीपणे कार चालवून अपघात केला. या अपघातात एका दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. हा अपघात सोमवारी (दि.27) दुपारी दोन वाजता जगताप डेअरी चौकाजवळ वाकड येथे झाला.

वेणुगोपाल प्रसाद इद्नुर (वय 29, रा. गुरुवार पेठ, पुणे) असे मृत्यू झालेल्या दुचाकीस्वराचे नाव आहे. याप्रकरणी वेणुगोपाल यांचा भाऊ राजू प्रसाद इद्नुर (वय 26) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी कार (एमएच 15 बीएन 7299) चालकाविरोधात विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवारी दुपारी फिर्यादी यांचा भाऊ वेणुगोपाल दुचाकीवरून (एमएच आरएल 9582) जगताप डेअरी चौकाजवळून जात होता. त्याच वेळी आरोपी इनोव्हा कारमधून जात होता.

उड्डाणपुलाजवळ आरोपीने कारचा इंडिकेटर न लावता अचानक कार रस्त्याच्या बाजूला घेतली. यामुळे वेणुगोपाल त्यांच्या दुचाकीसह कारवर जाऊन आदळले.

यात वेणुगोपाल यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. तसेच दोन्ही वाहनांचे मोठ्या प्रमाणत नुकसान झाले. या अपघातात वेणुगोपाल यांचा मृत्यू झाला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.