Wakad : भाईगिरीतून काळेवाडीत एकावर कोयत्याने वार; एकजण जखमी

एमपीसी न्यूज – ‘मी इथला भाई आहे’, असे म्हणून एकावर कोयत्याने वार केल्याची घटना काळेवाडी येथे शुक्रवारी (दि. 1) सायंकाळी घडली.यात एकजण जखमी झाला असून याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल केला आहे.

राजेंद्र शेटीबा मंजाळ (वय 39, रा. ज्योतीबा कॉलनी, तापकीरनगर, काळेवाडी) असे जखमी व्यक्‍तीचे नाव असून त्यांनी शुक्रवारी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अभिषेक माडगुळे (वय 20, रा. काळेवाडी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सायंकाळी पाच वाजताच्या सुमारास फिर्यादी मंजाळ हे काळेवाडीतील विष्णू राज मंगल कार्यालय येथून मित्रासोबत दुचाकीवरून चालले होते. त्यावेळी समोरून आलेला संशयित आरोपी माडगुळे याने ‘आपण इथला भाई आहे’, असे म्हणत मंजाळ यांच्यावर शिवीगाळ करीत कोयत्याने डोक्‍यावर वार केले. तसेच त्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. याबाबत सहाय्यक निरीक्षक अभिमन्यू पवार अधिक तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.