Wakad : कारचा हप्ता थकल्याने फायनान्स कंपनीच्या कर्मचा-यांची ग्राहकाला अरेरावी

एमपीसी न्यूज – कारचा हप्ता थकल्याने फायनान्स कंपनीच्या कर्मचा-यांनी ग्राहकाला दमदाटी व शिवीगाळ केली. तसेच जबरदस्तीने कारची चावी घेऊन पार्किंगमधून कार घेऊन गेले. ही घटना 5 ऑगस्ट रोजी सनशाईन नगर रहाटणी येथे घडली.

सचिन वामन थोरवे (वय 38, रा. सनशाईन नगर, रहाटणी) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार, जावेद मोमीन साचे, आशिष साळवे, विक्की पाटील (पूर्ण नाव पत्ता माहिती नाही) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सचिन यांनी महिंद्रा एक्सयुव्ही 500 ही कार घेतली. त्यासाठी त्यांनी टीव्हीएस क्रेडिट सर्व्हिसेस लिमिटेड या फायनान्स कंपनीकडून कर्ज घेतले. कारच्या कर्जाचे हप्ते थकल्याने फायनान्स कंपनीचे व्यवस्थापक जावेद आणि अन्य आरोपी 5 ऑगस्ट रोजी सचिन यांना ‘लायकी नाही तर कशाला लोन घेतले?’ असे म्हणत दमदाटी व शिवीगाळ केली.

आरोपींनी सचिन यांच्याकडून कारची चावी जबरदस्तीने घेऊन पार्किंगमधील कार कोणतीही नोटीस न देता घेऊन गेले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.