Wakad crime News : लग्नाच्या आमिषाने विवाहितेला पतीपासून घटस्फोटास भाग पाडले; बलात्कार, गर्भपात करून सोडून दिले

हा प्रकार जुलै 2016 पासून सप्टेंबर 2020 या कालावधीत रहाटणी, मोशी, कोथरूड, आंबेगाव, कात्रज, वाकड, थेरगाव येथे घडला.

एमपीसी न्यूज – एका विवाहित महिलेला तिच्या पतीसोबत घटस्फोट घेण्यास भाग पाडून तिला दुस-या लग्नाचे आमिष दाखवले. घटस्फोट घेतल्यानंतर तिच्यावर वारंवार बलात्कार केला. महिला गर्भवती राहिल्यानंतर तिचा जबरदस्तीने गर्भपात करून सोडून दिले.

हा प्रकार जुलै 2016 पासून सप्टेंबर 2020 या कालावधीत रहाटणी, मोशी, कोथरूड, आंबेगाव, कात्रज, वाकड, थेरगाव येथे घडला. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

आशिष राजू भोरे (वय 25, रा. तापकीरनगर, काळेवाडी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पिडीत महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हा प्रकार जुलै 2016 पासून सप्टेंबर 2020 या कालावधीत साईदीप लॉज जगताप डेअरी रहाटणी, सिल्वर ओक्स सोसायटी मोशी, शास्त्रीनगर कोथरूड, आंबेगाव खुर्द, कुतवळ हाउस कात्रज, वाघमारे वस्ती वाकड आणि थेरगाव येथे घडली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पिडीत महिलेचे लग्न झालेले असताना आरोपीने तिला घटस्फोट घेण्यास भाग पाडले. तिच्यासोबत वारंवार वेगवेगळ्या ठिकाणी शारीरिक संबंध ठेवले. फिर्यादी महिलेचे सहा तोळ्यांचे दागिने आरोपीने घेतले. महिलेने लग्नाबाबत आरोपीकडे विचारणा केली असता त्याने महिलेला शिवीगाळ व मारहाण केली.

फिर्यादी महिला आंबेगाव खुर्द आणि कात्रज येथे भाड्याने राहत असताना तिच्या घरी जाऊन त्याने महिलेसोबत शारीरिक संबंध ठेवले. दरम्यान, महिला गर्भवती राहिली.

ही बाब तिने आरोपीला सांगितली असता त्याने तिला गर्भपात करण्यास सांगितले. गर्भपात करण्यासाठी महिलेने नकार दिला असता आरोपीने दत्तनगर कात्रज येथील एका रुग्णालयात नेऊन तिचा गर्भपात केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.

वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.