Wakad : वाकड-भूमकर चौकातील वाहतूककोंडी सोडविण्याची काळाची गरज

एमपीसी न्यूज – जागतिक नकाशावर पिंपरी-चिंचवड शहराचे औद्योगिक क्षेत्र म्हणून ख्याती असली तरी ढिसाळ कारभारामुळे चाकण, तळवडे, पिंपरी-चिंचवड शहरातील सुमारे 35 लाखांहून अधिक रहिवाशी यांना आज अनेक समस्यांना सामोरे जाण्याची वेळ आली आहे. या औद्योगिक (क्षेत्र) शहराचे जगभरात नाव असले तरी, वाहतूकीच्या गलथान व्यवस्थापन व राज्य व केंद्र सरकारच्या लालफितीच्या कारभारामुळे त्याचा त्रास प्रवाशी, कामगार, अभियंते यांना मोठ्या प्रमाणात होत असून, वाकड-भूमकर चौकातून हिंजवडीकडे जाणार्‍या चौपदरी बोगदा मार्गाचे मुंबई-बैंगलोर राष्ट्रीय महामार्गावर आठ पदरी बोगदा करून वाहतूकीची कोंडी सोडविण्याची काळाची गरज निर्माण झाली आहे.

चाकण, भोसरी, तळवडे परिसरात इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक, आयटी हब सारखे काही हजार मोठे, मध्यम आणि लघुउद्योग क्षेत्रात काही लाख कामगार काम करतात. तसेच, हिंजवडी आयटी पार्कमध्ये आयटी कंपन्या फेज-1,2 आणि फेज-3 क्षेत्रात शेकडो कंपन्या कार्यरत आहे. या शहरात नोकरी व्यवसायानिमित्ताने सुमारे 20 लाखांहून अधिक राज्य व परराज्यातील नागरीक वास्तव्यास आहे. त्याप्रमाणे देश परदेशातील अनेक उद्योजक, कंपनी प्रतिनिधी कामानिमित्ताने या शहरात नेहमीच ये-जा करीत आहे.

  • चाकण, तळवडे, पिंपरी-चिंचवड शहर भागातील अनेक रहिवाशी नोकरी व्यवसायानिमित्त हिंजवडी औद्योगिक क्षेत्राकडे दिवसाच्या तिन्ही पाळ्यात ये-जा दुचाकी, चारचाकी, मध्यम व अवजड मालवाहतूक, कामगारांना ने-आण करणार्‍या चारचाकी उबेर, ओला, खाजगी चारचाकी, 22 सीटर, 28 सीटर, 50 सीटर खासगी बसेस मधून नियमित होत आहे. त्याचप्रमाणे पीएमपीएल बससेवा, रिक्षा आदी वाहनांतून हिंजवडी ते चाकण दुतर्फा वाहतूक होत आहे. भूमकर चौकात दररोज सकाळी साडेआठ ते अकरापर्यंत तसेच सायंकाळी पाच ते नऊ वाजेपर्यंत वाहतूकीच्या कोंडीमुळे उद्योजक, कामगार व प्रवासी हैराण झाले आहेत.

भूमकर चौकामध्ये डाव्याबाजूला सातारा, बैंगलोरकडे जाणार अरुंद रस्ता आहे. तसेच उजव्या बाजूला ताथवडे, बालाजी कॉलेज, डीवाय पाटील कॉलेज, शाहू कॉलेज, जेएसपीएम कॉलेजकडे जाणारा रस्ता अंदाजे 15 फूटी रस्ता देखील अरूंद आहे. त्याचप्रमाणे पुलाच्या बोगद्याच्या उजव्याबाजूला पिंपरी-चिंचवड शहरातून राष्ट्रीय महामार्गाला मुंबईकडे जाणारा अरुंद रस्ता आहे. डाव्याबाजूने बैंगलोर-सातारा मार्गावरून पिंपरी-चिंचवड शहरात येणारा अरुंद रस्ता आहे. शहरामध्ये येणारा हा रस्ता काळाखडक समोर आणि परिसरात येणारा रस्ता अरुंद असून वाहतूकीची कोंडी रस्ता रुंदीअभावी सतत होत आहे. त्यामुळे दोन ते तीन तास वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागते.

  • …… याकडे सरकारचे दुर्लक्ष
    कात्रजमार्गे पिंपरी-चिंचवड शहरात येणारे तसेच हिंजवडीमधून पिंपरी-चिंचवड मधून येणारे व तसेच जाणार्‍या प्रवाशीयांचे आतोणात हाल होत आहे. कामगार व दुचाकी, चारचाकी वाहनातून प्रवास करणार्‍या व खासगी बसेसमध्ये प्रवास करणार्‍यांना तासंतास या वाहतूकिला सामोरे जाण्याची वेळ येत आहे. त्यांचा वेळेचा अपव्यव, शारिरीक त्रास आणि वाहनातील इंधनाची नासाडी नियमित होत आहे. या गंभीर प्रश्नांकडे पिंपरी-चिंचवड महापालिका, राज्य व केंद्र सरकार या प्रश्नाकडे दुर्लक्ष करत आहे.

…. तर उच्च न्यायालयात जाणार
आज हजारो कामगार कंपनीच्या ठिकाणी नियोजीत वेळेत जाता येत नाही. उद्योग क्षेत्राचे देखील काम करणारे कामगार उद्योग क्षेत्रात नसल्यामुळे उद्योग क्षेत्रात मोठ्या प्रमाणात खंड पडत आहे. एकूणच राज्य व केंद्र सरकारचा महसूल वाया जात असून त्याचा आर्थिक फटका उद्योजकांनाही बसत आहे. येणार्‍या दोन महिन्यात या दैनंदिन भेडसावणार्‍या प्रश्नावर संबंधित प्रशासनाने योग्य ती ठोस कारवाई करून तोडगा काढला नाहीतर उच्च न्यायालयात प्रवाशी, कामगार, उद्योजकांचा हितार्थ जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात जाणार. याबाबतचे ई-मेलद्वारे पत्राद्वारे मागणीचे निवेदन आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राष्ट्रीय महामार्ग वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांना आज पाठविले आहे. चिंचवड प्रवासी संघाचे अध्यक्ष गुलामअली भालदार, एन.डी. भोसले, निर्मला माने, मुकेश चुडासमा, संभाजी बारणे, हार्दिक पटेल आदींनी मागणी केली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.