Wakad: लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार; संशयित युवकावर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – लग्नाचे आमिष दाखवून एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करण्यात आला. याप्रकरणी संशयित 30 वर्षीय युवकावर वाकड पोलीस ठाण्यात पास्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून संशयित आरोपीला अटक केली आहे.

अनिकेत भगवान काळभोर (वय ३०, रा. काळभोरनगर आकुर्डी) असे संशयित आरोपीचे नाव आहे. यासंदर्भात 17 वर्षीय मुलीने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी, संशयित आरोपी आणि तक्रारदार तरुणी एकमेकांच्या ओळखीचे आहेत. संशयित काळभोर याने तरुणीला लग्नाचे आमिष दाखविले. तरुणी अल्पवयीन असताना तिच्यावर अत्याचार केला. त्यामुळे तरुणीने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे . याप्रकरणी पोलिसांनी पास्को कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला असून संशयित आरोपीला अटक केली आहे. वाकड पोलीस अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.