BNR-HDR-TOP-Mobile

Wakad : वडिलोपार्जित संपत्तीचा हिस्सा मागत मुलाने केली आई-वडिलांना मारहाण

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज – वडिलोपार्जित असलेली संपत्ती विकून त्यातून येणाऱ्या पैशाचा हिस्सा मिळावा, यासाठी मुलाने आणि सूनेने मिळून आई-वडिलांना मारहाण केली. ही घटना थेरगाव येथे सोमवारी रात्री दहा वाजता घडली.

प्रसाद विलास अवघडे आणि प्रियांका प्रसाद अवघडे अशी आई वडिलांना मारहाण करणाऱ्या आरोपी मुलगा आणि सूनेचे नाव आहे. याप्रकरणी आई मीना विलास अवघडे (वय 60, रा. थेरगाव) यांनी याप्रकरणी वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी प्रसाद आणि प्रियंका पासून विभक्त राहतात. सोमवारी रात्री दोघांनी आई-वडिलांच्या थेरगाव येथील घरात जबरदस्तीने घुसले. वडील विलास अवघडे यांच्याकडे पुनावळे आणि कोल्हापूर येथील संपत्ती विकण्याची मागणी केली.

संपत्ती विकून येणाऱ्या पैशात हिस्सा देण्यासाठी धमकावले. त्यासाठी विलास अवघडे व मीना अवघडे यांनी नकार दिला असता मुलगा आणि सूने ने त्यांना मारहाण केली. तसेच घरातील साहित्याचे (सामानाचे) नुकसान केले. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून वाकड पोलिस अधिक तपास करीत आहेत.

HB_POST_END_FTR-A2

.