Wakad : काळेवाडीत भरदिवसा बर्निंग कारचा थरार

एमपीसी न्यूज – काळेवाडी येथे भरदिवसा बर्निंग कारचा थरार झाला आहे. काळेवाडीकडून पिंपरीकडे येणा-या कारला आग लागली आहे. ही घटना आज, रविवारी (दि. 22) दुपारी साडेबाराच्या सुमारास घडली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, काळेवाडीकडून पिंपरीच्या दिशेने येत असलेल्या कारने अचानक पेट घेतला. ही घटना आज दुपारी साडेबाराच्या सुमारास काळेवाडी येथील डी मार्टजवळ घडली. अग्निशमन विभागाला घटनेची माहिती मिळताच रहाटणी अग्निशमन विभागाचा एक बंब घटनास्थळी दाखल करण्यात आला आहे. आग आटोक्यात आली आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.