Wakad : टेम्पोच्या धडकेत दुचाकीस्वार तरुण जखमी

एमपीसी न्यूज – भरधाव वेगात आलेल्या टेम्पोने दुचाकीला मागच्या बाजूने धडक दिली. यात दुचाकीवरील तरुण गंभीर जखमी झाला. हा अपघात सोमवारी (दि. 9) दुपारी अडीच वाजता काळेवाडी येथील एम एम शाळा चौकात घडला.

रजत श्रीअनेकपाल सिंग (वय 26, रा. विशालनगर, वाकड) असे जखमी तरुणाचे नाव आहे. त्यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी एम एच 14 / सी पी 3652 या टेम्पोवरील चालकावर गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी सिंग हे सोमवारी दुपारी त्यांच्या दुचाकीवरून (एम एच 14 / एफ ई 3652) जात होते. काळेवाडी येथील एम एम शाळा चौकात आले असता त्यांच्या मागून आरोपी टेम्पोचालकाने टेम्पो(एम एच 14 / सी पी 3652) भरधाव वेगात चालवून सिंग यांच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली.

या अपघातात सिंग जखमी झाले. तसेच त्यांच्या दुचाकीचेही नुकसान झाले. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.