Wakad : पालघन बाळगल्याप्रकरणी तरुणाला अटक

एमपीसी न्यूज – पालघन बाळगल्याप्रकरणी पोलिसांनी एका तरुणाला अटक केली. त्याच्याकडून पालघन जप्त करण्यात आली आहे. ही कारवाई वाकड पोलिसांनी काळेवाडी येथे केली.

दीपक आबा दाखले (वय 23, रा. रहाटणी) असे अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे.

  • पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काळेवाडी येथील कुणाल हॉटेलच्या मागे एक तरुण बेकायदेशीररित्या पालघन घेऊन थांबला आहे. अशी माहिती वाकड पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा रचून दीपक याला ताब्यात घेतले. त्यांची अंगझडती घेतली असता त्याच्याजवळ शंभर रुपये किमतीची एक लोखंडी पालघन मिळून आली.

पोलिसांनी पालघन जप्त करून दीपकला अटक केली. त्याच्यावर महाराष्ट्र पोलीस कायदा तसेच आर्म ॲक्टप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.