Wakad : चोरटयांनी वाकडमधून दोन लाखांच्या मोटारसायकल पळविल्या

एमपीसी न्यूज – वाकड परिसरातील रहाटणी आणि मंगलनगर खिंवसरा येथून सुमारे दोन लाख पाच हजार रुपये किमतीच्या दोन महागड्या मोटारसायकल चोरीला गेल्या आहेत. याप्रकरणी बुधवारी (दि. 18) वाकड पोलीस ठाण्यात अज्ञातांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पहिल्या प्रकरणात प्रवीण सदाशिव शुक्ल (वय 53, रा. मथुरा कॉलनी, रहाटणी) यांनी अज्ञात चोरट्या विरोधात फिर्याद दिली.

_MPC_DIR_MPU_II

प्रवीण यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, त्यांची 80 हजार रुपये किमतीची मोटारसायकल (एम एच 14 /एच पी 4323) त्यांच्या घरासमोर लॉक करून पार्क केली होती. अज्ञात चोरट्याने त्यांची मोटारसायकल चोरून नेली. सोमवारी (दि. 16) पहाटे साडेबारा ते सकाळी आठ या वेळेत ही घटना घडली. वाकड पोलीस तपास करीत आहेत. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

दुसऱ्या प्रकरणात, कैवल्य विजय कडू (वय 22, रा. चक्रधर कॉलनी, मंगलनगर, खिंवसरा वाकड) यांनी अज्ञात चोरट्या विरोधात फिर्याद दिली आहे. कैवल्य यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, कैवल्य यांनी त्यांची सुमारे 1 लाख 25 हजार रुपये किमतीची केटीएम ड्यूक मोटारसायकल (एम एच 29 / बी एम 6888) घरासमोर पार्क केली होती. अज्ञात चोरट्याने दुचाकी चोरून नेली. हा प्रकार मंगळवारी (दि. 17) रात्री साडेआठ ते बुधवारी (दि. 19) सकाळी नऊच्या सुमारास घडला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.