Wakad : घरातील मंडळी देवदर्शनासाठी गेल्याचा फायदा घेत चोरटयांनी फोडले घर

एमपीसी न्यूज – देवदर्शनासाठी गेल्याने बंद असलेल्या घराचा कडी-कोयंडा उचकटून चोरटयांनी दोन लाखांचा ऐवज लंपास केल्याची घटना थेरगावमध्ये उघडकीस आली. या प्रकरणी गुरूवारी (दि.15) वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

या प्रकरणी दत्तात्रय कृष्णदेव शेरखाने (वय 34, रा.शिवतीर्थनगर, थेरगाव) यांनी फिर्याद दिली असून अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शेरखाने हे कुटुंबियांसह 12 नोव्हेंबर रोजी देवदर्शनासाठी शिर्डी, शनिशिंगणापूर आणि वणीदेवी येथे गेले होते. दरम्यान घरात कोणी नसल्याची संधी साधून चोरटयांनी दरवाजाचा कडी-कोयंडा उचकटून घरात प्रवेश केला. घरातील कपाटातील रोख रक्कम व सोन्या-चांदीचे दागिने असा 2 लाख 9 हजारांचा ऐवज चोरून पोबारा केला. 13 नोव्हेंबरला सायंकाळी चारच्या सुमारास शेरखाने घरी आले असता चोरीचा प्रकार उघडकीस आला. सहायक पोलीस निरीक्षक केंगार तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.