Wakad : अ‍ॅसिड फेकून जीवे मारण्याची पत्नीला धमकी; चौघांवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – पत्नीला अ‍ॅसिड फेकून जीवे मारण्याची धमकी देत तिचा छळ केला. तसेच मित्राच्या मदतीने पत्नीच्या घरात पाच लाखांची चोरी केली. याप्रकरणी पतीसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना इंदोर, वाकड, चेन्नई, नोएडा येथे घडली.

अमित पारसमल जैन (वय 37), मनोरमा पारसमल जैन (वय 62), पारसमल जैन (वय 66), जयंत अग्रवाल (वय 37, सर्व रा. इंदोर मध्यप्रदेश) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी 34 वर्षीय महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 24 जून 2012 ते 11 डिसेंबर 2019 या कालावधीत ही घटना घडली. आरोपींनी फिर्यादी महिलेच्या चारित्र्यावर संशय घेऊन तिच्या पगाराचे पैसे देण्याची मागणी केली. यावरून तिचा वारंवार शारीरिक व मानसिक छळ केला. पती अमित याने फिर्यादी महिलेला ऍसिड फेकून जीवे मारण्याची धमकी दिली.

आरोपी अमित आणि त्याचा मित्र जयंत या दोघांनी मिळून फिर्यादी महिलेच्या घराचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला. घरातून पाच लाख रुपये किमतीच्या वस्तू चोरून नेल्या. तसेच ‘तुझे माझ्याकडे असलेले फोटो एडिट करून सोशल मीडियावर व्हायरल करीन. तुझ्या नातेवाइकांना पाठवीन.’ अशी आरोपीने महिलेला धमकी दिली. आरोपीने फिर्यादी महिलेच्या ऑफिसमध्ये ई-मेल करून त्यांची बदनामी केली फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.