Wakad : पोटच्या मुलीच्या अपहरणाची दिली धमकी

एमपीसी न्यूज – पतीने पत्नीला आपल्याच मुलीच्या अपहरणाची धमकी देत तिचा छळ केला. ही घटना थेरगाव येथे घडली.

पंकज विठ्ठल सुतार (रा. विघ्नहर्ता कॉलनी, पवार नगर, थेरगाव) असे गुन्हा दाखल झालेल्या पतीचे नाव आहे. याबाबत पत्नीने वाकड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लग्न झाल्यानंतर एक वर्षाने आरोपी पती सुतार याने पत्नीकडे सोने आणि पैशाची मागणी केली. ही मागणी पूर्ण न केल्याने त्याने आपल्या पत्नीला त्रास देण्यास सुरवात केली. कौटुंबिक कारणावरून शिवीगाळ करीत कमरेच्या पट्ट्याने मारहाण केली. तसेच स्वतःच्याच मुलीचे अपहरण करण्याची धमकी दिली. सहायक निरीक्षक महेश स्वामी याबाबत अधिक तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.