Wakad crime News : व्हॉटस् ॲपवर मित्राचा फोटो ठेवत चॅटिंगद्वारे एकाला तीन लाखांचा गंडा

एमपीसी न्यूज – एका व्यक्तीच्या मित्राचा फोटो अज्ञात व्यक्तीने स्वतःच्या व्हॉटस् ॲप  डीपीवर ठेवत मित्र म्हणून चॅट करत तब्बल तीन लाख रुपयांची फसवणूक केली. हा प्रकार मंगळवारी (दि. 19) दत्त मंदिर रोड, वाकड येथे घडला.

याबाबत 41 वर्षीय तरुणाने   वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, मोबाईल क्रमांक 3208531206 चा धारक आणि 0170101030876 कॅनरा बँक खाते क्रमांक धारक याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने त्याच्या व्हॉटस् ॲप  डीपीवर फिर्यादी रौतेला यांचा मित्रा उमेश शर्मा यांचा फोटो ठेवला. त्यानंतर चॅटिंगमध्ये उमेश शर्माच बोलत असल्याचे भासवून आरोपीने फिर्यादी यांच्याकडे इमर्जन्सीचे कारण सांगत तीन लाख रुपयांची मागणी केली. फिर्यादी यांनी तीन लाख रुपये दिले.

त्यानंतर तो त्यांचा मित्र शर्मा नसल्याचे उघडकीस आले. याबाबत फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वाकड पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.