Wakad : पेटीएम अपडेट करण्याच्या बहाण्याने ज्येष्ठ महिलेची तीन लाखांची फसवणूक

Three lakh fraud on senior woman under the pretext of updating Paytm

एमपीसी न्यूज – पेटीएम अपडेट करण्याच्या बहाण्याने एका ज्येष्ठ महिलेची तीन लाख 7 हजारांची फसवणूक करण्यात आली. ही घटना वाकड येथे घडली.

याबाबत अलका विजयकुमार नळगीरकर (वय 68, रा. रूबी पार्क स्ट्रीट, वाकड) यांनी गुरुवारी (दि. 28)  वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात व्यक्‍तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 27 फेब्रुवारी 2020 रोजी फिर्यादी अलका यांना 8305755264 या क्रमांकावरून पेटीएम अकाऊंट अपडेट करण्यासाठी मेसेज आला. यामुळे अलका यांनी मेसेज आलेल्या क्रमांकावर फोन केला असता आरोपीने क्विक सपोर्ट हे अॅप्लिकेशन डाऊनलोड करण्यास सांगितले.

त्यानंतर अलका यांच्या बँक खात्याची माहिती त्यात भरण्यास सांगितली. या माहितीच्या आधारे आरोपीने अलका यांच्या बँक खात्यातील तीन लाख 7 हजार रुपये ऑनलाइन काढून घेत त्यांची फसवणूक केली.

वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.