Wakad : जुन्या भांडणाच्या रागातून टोळक्‍याकडून तिघांना मारहाण

एमपीसी न्यूज – जुन्या भांडणाच्या रागातून टोळक्‍याने तिघांना मारहाण केली. ही घटना वाकड येथील काळाखडक येथे रविवारी (दि. 25) रात्री आठच्या सुमारास घडली.

_MPC_DIR_MPU_II

शांताबाई भारत जाधव (वय 45, रा. काळाखडक झोपडपट्टी, वाकड) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार कल्याणी मोदले, संजय मोदले, अंकुश कोचे, प्रदिप पाटोळे व इतर तीन इसम यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचा मुलगा किरण जाधव याची आरोपी कल्याणी मुदले सोबत शनिवारी (दि. 24) किरकोळ वाद झाला होता. रविवारी किरण जाधव, शांताबाई यांची नात पूर्वा गुंजाळ आणि त्यांच्या ओळखीचा इसम दिलीप खुळे हे तिघेजण शांताबाई यांच्या अंगणात बसले होते. त्यावेळी आरोपी तिथे आले. शनिवारी झालेल्या भांडणाचा राग मनात धरून आरोपींनी अंगणात बसलेल्या तिघांना शिवीगाळ करत लाकडी दांडक्‍याने मारहाण केली. तसेच जाधव यांच्या शेजाऱ्यांनाही शिवीगाळ केली. यावरून शांताबाई यांनी मारहाणीचा गुन्हा नोंदवला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.