Wakad : वाकड, निगडी परिसरातून तीन दुचाकी लंपास

Three two-wheeler stolen from Wakad, Nigdi area

एमपीसी न्यूज – वाकड आणि निगडी परिसरातून अज्ञात चोरट्यांनी तीन दुचाकी चोरून नेल्या आहेत. याबाबत सोमवारी (दि. 8) गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

पहिल्या प्रकरणात अभिषेक शाम बोंबले (रा. आनंदवन हाऊसिंग सोसायटी, थेरगाव) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

बोंबले यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांची 25 हजार रुपये किमतीची दुचाकी (एमएच 14 / जीजे 4736) थेरगाव येथील आनंद हॉस्पिटलच्या समोरील रस्त्याच्या बाजूला पार्क केली होती.

अज्ञात चोरट्यांनी त्यांची दुचाकी चोरून नेली. हा प्रकार सोमवारी (दि. 8) सकाळी उघडकीस आली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

दुस-या प्रकरणात कमलेश बजरंगसिंग ठाकूर (वय 43, रा. स्पाईन रोड, घरकुल, चिखली) यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

ठाकूर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांची 35 हजार रुपये किमतीची दुचाकी (एमएच 14 / जीबी 3657) ट्रान्सपोर्टनगर निगडी येथे रेणुका ढाब्यासमोर पार्क केली होती.

त्यावेळी दुचाकीच्या डिक्कीमध्ये मोबाईल फोन ठेवलेला होता. अज्ञात चोरट्यांनी मोबाईलसह दुचाकी चोरून नेली. हा प्रकार 31 मे रोजी दुपारी तीन ते चारच्या सुमारास घडला आहे.

तिस-या प्रकरणात निशांत प्रमोद नेमाडे (वय 31, रा. यमुनानगर, निगडी) यांनी फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

नेमाडे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार त्यांची 12 हजार रुपये किमतीची दुचाकी (एमएच 14 / डीझेड 0526) 5 जून रोजी रात्री पावणे बारा वाजता घरासमोर पार्क केली होती.

रात्री अज्ञात चोरट्यांनी दुचाकी चोरून नेली. हा प्रकार 6 जून रोजी सकाळी उघडकीस आला. वरील दोन्ही गुन्ह्यांचा तपास निगडी पोलीस करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.