Wakad : वाकड, हिंजवडी, चाकणमधून तीन दुचाकी चोरटयांनी पळविल्या

एमपीसी न्यूज – वाकड, हिंजवडी आणि चाकण परिसरातून तीन दुचाकी चोरीला गेल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत. याबाबत बुधवारी (दि. 4) संबंधीत पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

पहिली घटना माने वस्ती, रहाटणी येथे घडली. पंकेशकुमार गणपतलालजी परिहार (वय 30, रा. मानेवस्ती, रहाटणी) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी परिहार यांनी त्यांची 30 हजार रुपये किमतीची एम एच 14 / एफ एल 0978 ही दुचाकी 14 फेब्रुवारी रोजी रात्री अकरा वाजता राहत्या घरासमोर लॉक करून पार्क केली. रात्री अज्ञात चोरट्यांनी दुचाकी चोरून नेली. ही घटना 15 फेब्रुवारी रोजी सकाळी उघडकीस आली. वाकड पोलीस तपस करीत आहेत.

दुसरी घटना चांदणी चौक, बावधन येथे घडली. बापू नारायण भागवत (वय 43, रा. भूगाव, ता. मुळशी) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी भागवत यांनी त्यांची 15 हजार रुपये किमतीची एम एच 12 / जी एल 7909 ही दुचाकी 26 फेब्रुवारी रोजी दुपारी तीन वाजता चांदणी चौकातील जुन्या पेट्रोल पंपाच्या आतील मोकळ्या जागेत पार्क केली. रात्री आठ वाजता दुचाकी चोरीला गेल्याचा प्रकार समोर आला. हिंजवडी पोलीस तपास करीत आहेत.

तिसरी घटना वाघजाईनगर येथील अल्ट्राइंजिनिअर्सच्या पार्किंगमध्ये घडली. प्रदीप सुरेश माने (वय 26, रा. चिखली. मूळ रा. कोल्हापूर) यांनी याप्रकरणी चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी माने यांनी त्यांची 20 हजार रुपये किमतीची एम एच 09 / बी आर 1411 ही दुचाकी वाघजाईनगर येथील अल्ट्राइंजिनिअर्स युनिट सहाच्या बाहेर 2 मार्च रोजी पार्क केली. दुपारी साडेबाराच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी दुचाकी चोरून नेली. चाकण पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.