BNR-HDR-TOP-Mobile

Wakad : अवजड सामान वाहणाऱ्या ट्रकचा अपघात; ब्रेक मारल्याने माल केबिन तोडून बाहेर

INA_BLW_TITLE

एमपीसी न्यूज- अवजड माल वाहून नेत असताना ट्रकचालकाने अचानक ब्रेक मारल्याने माल केबिन तोडून बाहेर पडला. यामध्ये ट्रकचालक व क्लिनर किरकोळ जखमी झाले. तसेच काही काळ वाहतूककोंडी झाली. बालेवाडी रस्त्यावरील राधा चौक परिसरात सोमवारी (दि.१) सकाळी अकराच्या सुमारास हा अपघात झाला.

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी सकाळी मशीनचे अवजड स्पेअर पार्ट वाहून नेणारा ट्रक मुबईच्या दिशेने जात होता. बालेवाडीच्या पुढे राधा चौक येथे आला असता ट्रकचालकाने अचानक ब्रेक मारला. यामुळे दोरीने बांधलेला अवजड माल थेट चालकाचे केबिन तोडून आत घुसला व केबिन तोडून बाहेर पडला. बाहेर उडी मारण्याच्या प्रयत्नात चालक व क्लिनर किरकोळ जखमी झाले. माल रस्त्यात पडल्याने वाहतूक विस्कळीत झाली. दरम्यान हिंजवडी पोलिस व वाहतूक पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत अर्ध्या तासात वाहतूक नियंत्रित केली.

HB_POST_END_FTR-A4

.