Wakad: काळेवाडीमध्ये अडीच लाखांची घरफोडी

Wakad: Two and a half lakh burglary in Kalewadi पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

एमपीसी न्यूज – काळेवाडी मधील वैभवनगर येथे अज्ञात चोरट्यांनी दोन लाख 40 हजार 500 रुपयांचे सोन्याचे, डायमंड्सचे दागिने आणि रोख रक्कम चोरून नेली आहे. हा प्रकार 21 जुलै रोजी रात्री तीन वाजताच्या सुमारास उघडकीस आला आहे.

वंदना रजनीकांत श्रीसुंदर (वय 49, रा. वैभवनगर, विजयनगर, काळेवाडी) यांनी याप्रकरणी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी अज्ञात चोरट्याच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी श्रीसुंदर यांचे घर 18 जुलै रोजी सकाळी साडेदहा ते 21 जुलै रोजी रात्री तीन या कालावधीत बंद होते.

दरम्यानच्या कालावधीत अज्ञात चोरट्यांनी घरात प्रवेश करून लोखंडी कपाटातील लॉकरमध्ये ठेवलेले एक लाख 75 हजार रुपयांचे सोन्याचे दागिने, तसेच एक लाख आठ हजार रुपये किमतीचे डायमंडचे दागिने आणि साडे सात हजारांची रोख रक्कम असा एकूण दोन लाख 40 हजार 500 रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.