Wakad : दशक्रिया विधी घाटावरील पत्र्याच्या शेडवर दोघे अडकले

एमपीसी न्यूज – वाकड येथील म्हातोबानगर मधील दशक्रिया विधी घाटावर असलेल्या पत्र्याच्या शेडवर दोघेजण अडकले. दोघांची सुटका करण्यासाठी अग्निशमन विभाग आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाने घटनास्थळाकडे धाव घेतली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुळा नदीच्या किनारी वाकड मधील म्हातोबा नगर येथे असलेल्या दशक्रिया विधी घाटावर बांधलेल्या पत्र्याच्या शेडवर दोघेजण अडकले. नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने हे दोघेजण अडकले आहेत. याबाबतची माहिती अग्निशमन विभागाला समजताच हिंजवडी एमआयडीसी आणि संत तुकाराम नगर अग्निशमन दलाचे जवान आणि आपत्ती व्यवस्थापन विभागाचे कर्मचारी घटनास्थळी पोहोचले आहेत.

नदीच्या पाण्याची पातळी वाढत असून पावसाचा जोर देखील सुरूच आहे. त्यातूनही दशक्रिया विधी घाटावरील पत्र्याच्या शेडवर अडकलेल्या दोघांची सुटका करण्याचे प्रयत्न सुरू आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.