Wakad: महिलेच्या अंगावर चुकून डांबर उडाल्याने दोघांना बेदम मारहाण

Wakad: Two people were beaten for accidentally throwing tar on a woman's body फिर्यादी यांनी महिलेला रस्त्यावर घाण टाकू नका, असे सांगितले. दरम्यान फिर्यादीचा कामगार सनिल किसन चव्हाण याच्याकडून चुकून महिलेच्या अंगावर डांबर उडाले.

एमपीसी न्यूज– महिलेच्या अंगावर चुकून डांबर उडाल्याने महिलेचा पती आणि मुलाने दोघांना लोखंडी पाईपने बेदम मारहाण केली. ही घटना शुक्रवारी (दि.12) दुपारी दीड वाजताच्या सुमरास ज्योतिबा नगर, काळेवाडी येथे घडली.

अन्वर जाफील शेख, आरमान अन्वर शेख (वय 18, रा. ज्योतिबा नगर, काळेवाडी) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी हरिश्चंद्र महावीर यादव (वय 50, रा. मोरवाडी, पिंपरी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आणि त्यांचे कामगार ज्योतिबा नगर काळेवाडी येथील गजराज कॉलनीमध्ये रस्त्यावर डांबर टाकण्याचे काम करत होते. त्यावेळी आरोपी अन्वर याच्या पत्नीने रस्त्यावर कचरा टाकला.

फिर्यादी यांनी महिलेला रस्त्यावर घाण टाकू नका, असे सांगितले. दरम्यान फिर्यादीचा कामगार सनिल किसन चव्हाण (वय 32) याच्याकडून चुकून महिलेच्या अंगावर डांबर उडाले.

यावरून महिलेने तिचे पती अन्वर आणि मुलगा आरमान या दोघांना बोलावून घेतले. दोन्ही आरोपींनी फिर्यादी आणि त्यांचा कामगार अनिल चव्हाण यांना लोखंडी पाईपने बेदम मारहाण केली. यात दोघांच्या डोक्यात आणि पायावर गंभीर दुखापत झाली आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.