Wakad : गस्तीवरील पोलिसांनी कामात कुचराई केल्याने एटीएम फुटल्याचा ठपका ठेवत दोन पोलीस निलंबित

एमपीसी न्यूज – रात्र गस्तीच्या वेळी कामात कुचराई केली. यामुळे थेरगाव परिसरात चोरट्यांनी एटीएम फोडले आल्याचा ठपका ठेवत दोन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी मंगळवारी (दि. 28) याबाबतचे आदेश दिले आहेत.

आनंद टिंगरे आणि ज्ञानेश्वर कैलगे अशी निलंबित करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावे आहेत.

पिंपरी चिंचवड शहरात एटीएम आणि सराफांच्या दुकानात चोरी करण्याचे जोरदार सत्र सुरू आहे. यामुळे रात्र गस्तीवरील पोलिसांना सराफांची दुकाने आणि एटीएमची तपासणी करण्याचे आदेश वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून देण्यात आले आहेत. थेरगाव परिसरात रविवारी रात्री एक एटीएम फोडल्याचा प्रकार समोर आला. रविवारी रात्री रात्रगस्तीवर असलेले आनंद टिंगरे आणि ज्ञानेश्वर कैलगे यांनी चोरी झालेल्या एटीएमला भेट दिली नसल्याचे उघडकीस आले. त्यामुळे त्यांनी कामात कुचराई केल्याचा ठपका ठेवत अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी त्यांना निलंबित करण्याचे आदेश दिले.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.