Wakad : डंपरच्या धडकेत दुचाकीस्वाराचा मृत्यू; डंपरचालकवर गुन्हा दाखल

एमपीसी न्यूज – भरधाव वेगातील डंपरने धडक दिल्यामुळे झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा मृत्यू झाला. ही घटना ताथवडे येथे बुधवारी (दि. 26) दुपारी घडली.

सोनू मख्खन कुमार (वय 29, रा. ताथवडे) असे अपघातात मृत्यू झालेल्या दुचाकीस्वाराचे नाव आहे. राजेश यलप्पा वाघेकर (वय 35, रा. काळाखडक, वाकड) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे. पोलीस कर्मचारी विक्रांत चिंतामण चव्हाण यांनी बुधवारी (दि. 26) याबाबत वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी वाघेकर हा एम एच 14 / जी यू 9839 हा डंपर चालवत होता. तो ताथवडे येथील जेएसपीएम कॉलेज जवळील सर्व्हिस रोडवर आला असता त्याने इंडिकेटर न देता डंपर अचानक उजव्या बाजूला वळविला. त्यावेळी समोरून आलेल्या एम एच 12 /एफ ई 0032 या दुचाकीला डंपरने जोरदार धडक दिली.

या अपघातात सोनू कुमार यांचा गंभीर जखमी होऊन मृत्यू झाला. तसेच दुचाकीचेही मोठ्या प्रमाणात नुकसानीस डंपरचालक कारणीभूत ठरला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.