Wakad crime News :कारवाई केल्यामुळे दुचाकीस्वाराची पोलीस उपनिरीक्षकासोबत हुज्जत

सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी एकाला अटक

एमपीसी न्यूज – वाहतुकीच्या नियमांचे पालन न केल्याने एका दुचाकीवर वाहतूक पोलिसांनी कारवाई केली. त्यावरून दुचाकीस्वाराने कारवाई करणा-या पोलीस उपनिरीक्षकाची व्हिडीओ शूटिंग काढली. तसेच त्यांच्यासोबत झटापट करून त्यांना ढकलून देत शासकीय कामात अढथळा निर्माण केला. याबाबत एकाला अटक करण्यात आली आहे.

अमोल गोरक्ष निमसे (वय 39, रा. रहाटणी) असे अटक केलेल्या दुचाकीस्वाराने नाव आहे. याबाबत पोलीस उपनिरीक्षक मोहन लालप्पा जाधव यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जाधव हे पोलीस उपनिरीक्षक असून ते सांगवी वाहतूक विभागात कार्यरत आहेत. उपनिरीक्षक जाधव सोमवारी सकाळी रहाटणी फाटा, काळेवाडी येथे वाहतूक नियमन करत होते. त्यावेळी तिथून एका मोपेड दुचाकीवरून (एमएच 14 / ईएस 2417) आरोपी अमोल गेला. त्याने वाहतुकीच्या नियमांचे पालन न केल्याने उपनिरीक्षक जाधव यांनी अमोलवर कारवाई केली.

त्याचा राग आल्याने अमोल याने उपनिरीक्षक जाधव यांचा व्हिडिओ शूट केला. तसेच झटापट करत त्यांना ढकलून दिले. उपनिरीक्षक जाधव करत असलेल्या सरकारी कामात अडथळा निर्माण करून अमोल पळून गेला. दरम्यान, पोलिसांनी अमोल याला अटक केली आहे.

वाकड पोलीस तपास करीत आहेत.

 

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.