Wakad : तरुणीच्या विनयभंग प्रकरणी दोघांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – तरुणीचा विनयभंग करून तिच्या वडिलांना मारहाण केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना लोंढे वस्ती, ताथवडे येथे घडली.

पिन्या पवार, राहुल पवार अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी 19 वर्षीय तरुणीने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी तरुणी घरी एकटी असताना आरोपींनी तिच्याशी गैरवर्तन करून तिचा विनयभंग केला. याबाबत तरुणीने तिच्या वडिलांना सांगितले. फिर्यादीचे वडील आरोपींना जाब विचारण्यासाठी गेले असता आरोपींनी फिर्यादीच्या वडिलांना लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.