Wakad : पत्नीच्या मावस बहिणीशी विवाह करण्यासाठी विवाहितेचा छळ; 13 जणांवर गुन्हा

एमपीसी न्यूज – दुसरा विवाह करण्यासाठी पहिल्या पत्नीला घटस्फोट मागितला. पत्नीने नकार दिल्यावरून सासरच्या मंडळींनी विवाहितेचा शारीरिक आणि मानसिक छळ केला. याप्रकरणी विवाहितेने 13 जणांविरोधात गुन्हा नोंदवला. ही घटना थेरगाव येथे घडली.

पती जालिंदर निवृत्ती बडे, दीर भास्कर बडे, नणंद कस्तुरा भास्कर कुटे, भाचा सचिन भास्कर कुटे, नणंद सीता अर्जुन खाडे, भाचा ज्ञानेश्वर अर्जुन खाडे, नंदावा अर्जुन काशिनाथ खाडे, भाचा राम किसन भीमराव खाडे, भाचा त्रिंबक भीमराव खाडे, मावस बहीण वंदना रामभाऊ कारखेले, मावस भाऊ गोरक्षनाथ रामभाऊ कारखेले, मावशी जिजाबाई कारखेले यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी 42 वर्षीय महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली.

  • याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी पती जालिंदर आणि फिर्यादी महिलेचा 1997 साली विवाह झाला आहे. मात्र, आरोपीला पत्नीच्या मावस बहिणीसोबत विवाह करायचा होता. त्यासाठी सर्व आरोपी नातेवाईकांनी फिर्यादी विवाहितेकडे घटस्फोट देण्याची मागणी केली. फिर्यादी यांनी त्यासाठी नकार दिला असता सर्वांनी मिळून त्यांना शिवीगाळ करत मारहाण केली.

पतीने महिलेच्या स्त्रीधनाची परस्पर विल्हेवाट लावली. तसेच पती फिर्यादी महिलेच्या मावस बहिणीसोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहून फिर्यादी महिलेला शारीरिक व मानसिक त्रास दिला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस उपनिरीक्षक भोगम तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.