Wakad: पेटीएम केवायसी अपडेट करण्याच्या बहाण्याने सव्वादोन लाखाला गंडविले

एमपीसी न्यूज –  पेटीएम कस्टमर केअर मधून बोलत असल्याची बतावणी करत पेटीएम अपडेट करण्याच्या बहाण्याने ’क्विक सपोर्ट अ‍ॅप’ डाउनलोड करण्यास सांगत त्याअ‍ॅपद्वारे एकाच्या क्रेडीट कार्ड, पेटीएमची सर्व माहिती घेऊन दोन लाख 28 हजारांची फसवणूक केली. हा प्रकार वाकड येथे नुकताच उघडकीस आला.

याप्रकरणी दिनकर वसंत थोरात (वय 36, रा. ताथवडे) यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार 7865858614 या मोबाईल क्रमांकावरून बोलणार्‍या आरोपीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

_MPC_DIR_MPU_II

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दिनकर थोरात यांना 7865858614 या मोबाईलवरून फोन आला. आरोपीने पेटीएम कस्टमर केअरमधून बोलत असल्याचे सांगून थोरात यांचा विश्वास संपादन केला. पेटीएम अपडेट करण्याच्या बहाण्याने ‘क्यूक सपोर्ट अ‍ॅप’ डाउनलोड करण्याचे सांगितले. त्याअ‍ॅपद्वारे त्यांच्या सिटी बँकेच्या क्रेडीट कार्ड, पेटीएमची सर्व माहिती घेतली. त्याव्दारे आरोपी याने थोरात यांच्या खात्यावरून दोन लाख 28 हजार 297 रूपये स्वतःच्या बॅक खात्यावर वळते करून घेऊन फसवणूक केली. वाकड पोलीस तपास करत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.