Wakad : अश्विनी जगताप यांच्या प्रचारासाठी विजय जगताप यांचा नागरिकांशी संवाद

एमपीसी न्यूज : भाजप आणि महायुतीच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप (Wakad) यांच्या प्रचारासाठी दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू विजय जगताप यांनी रविवारी वाकड परिसरात घरोघरी जाऊन नागरिकांशी संवाद साधला. या भागात राहणाऱ्या कलाटे आणि वाकडकर कुटुंबांनी आम्ही लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या कुटुंबियांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे सांगितले. तसेच वाकडची जनता कमळाच्या चिन्हावर मतदान करून अश्विनी लक्ष्मण जगताप यांना एक लाखांच्या मताधिक्याने विजयी करणार असा विश्वास व्यक्त केला.

चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीतील भाजपा, बाळासाहेबांची शिवसेना, आरपीआय आठवले गट, राष्ट्रीय समाज पक्ष, शिवसंग्राम, रयत क्रांती व प्रहार संघटना महायुतीच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे.

संपूर्ण जगताप कुटुंबसुद्धा प्रचारात उतरले आहे. दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांचे बंधू विजय जगताप यांनी रविवारी वाकड भागात घरोघरी नागरिकांशी संवाद साधला. या भागातील सर्व नागरिकांना भाजपाच्या उमेदवार अश्विनी लक्ष्मण जगताप यांच्या प्रचारपत्रकाचे वाटप केले.

त्यांच्या या प्रचारात वाकड भागातील कलाटे आणि वाकडकर कुटुंबांनी साथ दिली. वाकडच्या (Wakad) विकासात दिवंगत आमदार लक्ष्मण  जगताप यांचाच मोठा वाटा आहे. अन्य कोणी कितीही बढाया मारल्या तरी लक्ष्मणभाऊ जगताप यांनीच वाकडचा कायापालट केला.

आज या भागातील नागरिकांचे जीवनमान उंचावण्यामध्ये लक्ष्मणभाऊ जगताप यांचे मोठे योगदान आहे. त्यामुळे येथील कलाटे आणि वाकडकर कुटुंबिय पोटनिवडणुकीत लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या पत्नी अश्विनी लक्ष्मण जगताप यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचा विश्वास त्यांनी दिला. वाकडची जनता अश्विनी लक्ष्मण जगताप यांना एक लाखाच्या मताधिक्याने निवडून देणार असल्याचाही विश्वास त्यांनी व्यक्त केला.

Today’s Horoscope 13 February 2023 – जाणून घ्या आजचे राशिभविष्य

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.