Wakad : शहरात विनाकारण फिरणाऱ्या 50 वाहन चालकांविरुद्ध वाकड पोलिसांची कारवाई

एमपीसी न्यूज – कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी सरकारने संपूर्ण देशभरात संचारबंदी लागू केली असून, शहरात विनाकारण फिरण्यावर बंदी आहे. त्यामुळे विनाकारण रस्त्यावर फिरणाऱ्या 50 वाहनचालकांवर वाकड पोलिसांनी कारवाई केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संचारबंदीच्या काळात कोणत्याही व्यक्तीला सार्वजनिक रस्त्यावर गल्लीत मोटारसायकल, कार तसेच जड वाहने चालविण्यास बंदी आहे. याबाबतचे आदेश सरकारकडून जारी करण्यात आले आहेत. या आदेशांना झुगारून काही वाहन चालक सार्वजनिक रस्त्यावर वाहने चालवताना दिसत आहेत.

या पार्श्वभूमीवर वाकड पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे. वाकड पोलिसांनी 50 वाहन चालकाविरुद्ध कारवाई करत त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत. कारवाई केलेले वाहनचालक विनाकारण रस्त्यावर फिरताना आढळून आले आहेत. अत्यावश्यक कारणाशिवाय घराबाहेर न पडण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.