Wakad : अनैतिक संबंधातून पत्नीवर चाकूने वार; पतीचा आत्महत्येचा प्रयत्न

एमपीसी न्यूज- अनैतिक संबंधावरून झालेल्या वादातून पतीने पत्नीवर चाकूने वार करत स्वतःही आत्महत्येचा प्रयत्न केल्याची घटना रहाटणीमध्ये घडली. या प्रकरणी सोमवारी (दि.1) वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी चित्रलेखा गजानन सूर्यवंशी (वय 51, रा,नखातेवस्ती, रहाटणी) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार जावई दीनदयाल बाबुलाल बावनकर (रा.रहाटणी) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भावना दीनदयाल बावनकर असे जखमी पत्नीचे नाव आहे.

पोलीस उपनिरीक्षक हनुमान बांगर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी दीनदयाल हा फिर्यादी यांचा जावई आहे. एका महिलेशी अनैतिक संबंध असल्याच्या कारणातून फिर्यादी यांची मुलगी भावना व दीनदयाल यांच्यात वाद होत असे. चार दिवसांपूर्वी (दि. 29) आरोपी व भावना यांच्यात वादविवाद झाले. दरम्यान दीनदयाल याने पत्नीला शिवीगाळ व मारहाण करीत चाकूने गालावर, पाठीवर, पोटावर चाकूने वार करून गंभीर जखमी केले. त्यानंतर स्वतःवर वार करून आत्महत्येचा प्रयत्न केला. भावना या शुद्धीवर आल्या असता सोमवारी त्यांचा जबाब नोंदवून वाकड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.