Wakad : गांजा विक्री प्रकरणी महिलेला अटक

एमपीसी न्यूज – गांजा विक्री प्रकरणी अंमली पदार्थ विरोधी पथकाने एका महिलेला (Wakad) अटक केली आहे. ही कारवाई शनिवारी (दि. 13) दुपारी म्हातोबानगर झोपडपट्टी, वाकड येथे करण्यात आली.

पोलीस अंमलदार प्रसाद जंगीलवाड यांनी वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी 50 वर्षीय महिलेला अटक केली आहे.

Mahalunge : रिक्षाचालकाला मालकाकडून बेदम मारहाण

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, म्हातोबानगर झोपडपट्टी येथे एक महिला गांजा विक्रीसाठी येणार असल्याची माहिती अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा लाऊन महिलेला ताब्यात घेतले. तिच्याकडून 272 ग्राम वजनाचा गांजा आणि एक मोबाईल फोन असा एकूण 18 हजार 600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.