Wakad : Wakad : आठव्या मजल्यावरून उडी मारून महिलेची आत्महत्या

Woman commits suicide by jumping from eighth floor

एमपीसी न्यूज – एका महिलेने राहत्या इमारतीच्या आठव्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्त्या केली. ही घटना आज (गुरुवारी) दुपारी एकच्या सुमारास रॉयल राधिका ग्रीन अपार्टमेंट, काळेवाडी फाटा येथे घडली.

तनिका शर्मा (वय 31, रा.  रॉयल राधिका ग्रीन अपार्टमेंट, काळेवाडी, रहाटणी. मूळ रा. दिल्ली) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मयत तनिका यांना चार वर्षांचा मुलगा आहे. आपल्या मुलासोबत त्या काळेवाडी फाटा येथील  रॉयल राधिका ग्रीन अपार्टमेंट मध्ये राहत होत्या.

आज दुपारी तनिका आणि त्यांचा चार वर्षांचा मुलगा असे दोघेजण घरी होते. तनिका यांनी त्यांच्या फ्लॅटच्या गॅलरीमधून उडी मारून आत्महत्या केली.

तनिका यांचे सर्व कुटुंबीय आणि नातेवाईक दिल्ली येथे आहेत. याबाबत त्यांच्या नातेवाईकांना कळविण्यात आले आहे. वाकड पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

तनिका यांचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.