Wakad : फसव्या स्कीमद्वारे महिलेची 22 लाखांची फसवणूक

एमपीसी न्यूज – युट्यूबवरील व्हिडिओ लाईक करा, शेअर करा (Wakad) त्याद्वारे भरपूर पैसे कमवा, या फसव्या योजनेद्वारे महिलेची 21 लाख 95 हजारांची फसवणूक करण्यात आली. हा प्रकार बुधवारी (दि. 22) वाकड येथे घडला. याप्रकरणी महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्यादी दिली आहे. त्यानुसार अनोळखी व्यक्तींच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनोळखी व्यक्तींनी महिलेशी संपर्क करून युट्यूबवरील व्हिडिओ लाईक केल्यास पैसे मिळतील असे सांगून त्यांना वेगवेगळ्या व्हिडिओच्या लिंक शेअर केल्या. आरोपींनी शेअर केलेल्या लिंक फिर्यादी महिलेने लाईक आणि शेअर केल्या.
Pimple Gurav : पिस्टल बाळगल्या प्रकरणी तरुणास अटक
सुरुवातीला महिलेच्या खात्यामध्ये दीड हजार रुपये जमा झाले. फिर्यादी (Wakad) यांचा आरोपींवर विश्वास बसल्यानंतर आरोपींनी आणखी टास्क पूर्ण करण्याची योजना सांगितली. फिर्यादी महिलेने आरोपींनी सांगितल्याप्रमाणे टास्क पूर्ण केले. मात्र, त्यांना नंतर पैसे मिळाले नाहीत. पैसे मिळण्यासाठी पुढील टास्क पूर्ण करावे लागतील अशी अट घालून आरोपींनी महिलेची 21 लाख 95 हजार 20 रुपयांची फसवणूक केली असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. वाकड पोलीस तपास करीत आहेत.