Wakad : महिलेशी लगट करणाऱ्यावर विनयभंगाचा गुन्हा

एमपीसी न्यूज – महिलेशी लगट करून तिचा विनयभंग करण्याची घटा वाकड येथे घडली. याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी 31 वर्षीय महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. विशाल विजयकुमार जाजू (वय 38, रा. वाकड) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना 23 नोव्हेंबर रोजी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास वाकड येथे घडली. फिर्यादी महिलेशी लगट करून आरोपीने मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य करून त्यांचा विनयभंग केला. याबाबत महिलेने पोलिसात धाव घेत गुन्हा नोंदवला. वाकड पोलीस तपास करीत आहेत.

MPCNEWS आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@mpcnews1) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.